भाजपच्या मनमानीला कंटाळून भाजपा खासदाराने दिला पदाचा राजीनामा

भाजपच्या मनमानीला कंटाळून भाजपा खासदाराने दिला पदाचा राजीनामा

गुजरातमधील भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि खासदार मनसुख वसावा यांनी पक्षाच्या आडमुठेपणाला कंटाळून पक्षाला रामराम ठोकला आहे. मनसुख वसावा यांनी गुजरात भाजपचे प्रदेशाध्यक्ष सीआर पाटील यांच्याकडे आपला राजीनामा पाठवला आहे. हा गुजरातमध्ये भाजपाला मोठा धक्का मानला जात आहे.

वरिष्ठ नेतृत्वाकडून आपले म्हणणं ऐकून घेतले जात नसल्याने मनसुखभाई वासवा नाराज होते. वासवा यांनी भाजप प्रदेशाध्यक्षांना एक पत्र लिहून आपली नाराजीही कळवली होती. आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनात आपण लोकसभेचाही राजीनामा देणार असल्याचंही त्यांनी या पत्रात म्हटले होते.

राज्यात आदिवासी महिलांच्या तस्करीचा मुद्दा त्यांनी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्यासमोर मांडला होता. तसंच स्टॅच्यु ऑफ युनिटीच्या मुद्यावरही वासवा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पत्र लिहिलं होतं.

या पत्रात त्यांनी ‘स्टॅच्यु ऑफ युनिटी’च्या जवळपासचा इको-सेन्सिटिव्ह झोन रद्द करण्याची मागणी केली होती. मात्र त्यांच्या मागणीकडे सतत दुर्लक्ष होत होत. त्यामुळे कंटाळून वासवा यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.

ग्लोबल न्युज नेटवर्क: