उद्धव ठाकरेंनी शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखांना दिलेल्या आदेशातून वेगळा अर्थ काढण्याची गरज नाही

उद्धव ठाकरेंनी शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखांना दिलेल्या आदेशातून वेगळा अर्थ काढण्याची गरज नाही

शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून राज्यातील सर्व शिवसेना जिल्हाप्रमुखांशी संवाद साधला होता. यावेळी महाराष्ट्रावर शिवसेनेचा एकहाती भगवा फडकेल या दृष्टीने आतापासूनच तयारीला लागा, असे आदेश शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्व जिल्हाप्रमुखांना होता. मात्र या विषयावरून राजकारण करत आघाडी सरकारमध्ये फूट पडण्यासाठी विरोधकांनी प्रयत्न सुरु केला.

यावर आता खुद्द राष्ट्रवादीचे अध्यक्ष, महाविकास आघाडीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी भाष्य केले आहे. शिवसेनेचा भगवा फडकवा, हे भाषण ३० वर्षांपासून ऐकत आहे. प्रत्येकाला आपला पक्ष मोठा करण्याचं स्वातंत्र्य आहे. यातून वेगळा अर्थ काढण्याची आवश्यकता नाही अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिली.

पुढे बोलताना पवार म्हणालेत की, स्थानिक स्वराज्य संस्था एकत्र लढवायच्या की स्वतंत्र, हा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील घेतील, असे त्यांनी बोलून दाखविले. भाजपाला दूर ठेवण्यासाठी एकत्र आलात तर लोकांना चांगली फळं मिळताना दिसत आहेत, त्यामुळे त्याच दिशेने काम करा, असा सल्लाही यावेळी शरद पवारांनी यावेळी दिला.

ग्लोबल न्युज नेटवर्क: