आजोबांच्या कौतुकानंतर पंकजाताईंना रोहित पवार म्हणाले…

मुंबई: राजकारण  म्हटलं की सत्ता, पक्ष, राजकारणी हे सगळ आलंच. एकमेकांच्या विरोधी पक्षात असलेले नेते नेहमीच एकमेकांवर टीकेची  झोड उठवत असतात. मात्र त्यातही असे काही नेते असतात जे विरोधी पक्षातील नेत्यांचे कौतुकही करतात. राजकारणातील हा दिलदारपणा फार कमी लोकांकडे आढळून येतो. भाजपच्या पंकजा मुंडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचेअध्यक्ष शरद पवार यांच्या दौऱ्याचे असेच काहीसे कौतुक केले. ट्विटरवर त्यांनी शरद पवार हे कोरोनाच्या या संकटकाळात ज्या उर्जेने काम करत आहेत त्याचे कौतुक केले. 



त्यांच्या या कौतुकानंतर शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांनी आभार मानले आहेत इतकंच नव्हे तर इतर राजकारणी लोकांनी पंकजा ताईंकडून मनाचा मोठेपणा शिकावा असेही म्हटले आहे. 

पंकजा मुंडे यांनी पवार यांच्या कामाची स्तुती करत असताना म्हटले की, @PawarSpeaks hats off … कोरोना च्या परिस्थितीत इतका दौरा , आपली बैठक आणि आपल्या काम करण्याच्या स्टॅमिना चे अप्रूप वाटले … पक्ष ,विचार आणि राजकारण वेगळे जरी असले तर कष्ट करणाऱ्या विषयी आदर व्यक्त करायचे मुंडे साहेबानी शिकवले आहे. 

पवार साहेब हॅट्स ऑफ…पंकजा मुंडेंनी केले शरद पवारांचे केले जाहीर कौतुक

यांच्या या ट्विटनंतर रोहित पवार यांनी पंकजा मुंडे यांचे जाहीरपणे ट्विटरवरून आभार मानले आहेत. तसेच त्यांनी म्हटले की धन्यवाद ताई! राजकारणातील हा दिलदारपणा आणि खिलाडूवृत्ती फक्त महाराष्ट्रात दिसते आणि महाराष्ट्राची ती संस्कृती आहे. पण अलीकडे आपल्या राजकीय फायद्यासाठी राज्याचा अवमान करणाऱ्यांनी आपल्याकडून मनाचा मोठेपणा जरूर शिकावा.

ग्लोबल न्युज नेटवर्क: