“‘त्या’ पोलमध्ये भाजपच्या एकाही मुख्यमंत्र्याचं नाव नाही, भाजपचा ग्राफ कोसळतोय”

 

देशातील लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या सर्वेक्षणातही ही बाब उघड झाली आहे. ‘इंडिया टुडे’ने नुकत्याच केलेल्या सर्व्हेत लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादीत पहिल्या पाचमध्ये भाजपचा एकही मुख्यमंत्री नाही. मात्र या यादीत विशेष म्हणजे देशातील पहिल्या पाच मुख्यमंत्र्यांमध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा समावेश आहे. याच मुद्द्यावरून शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी भाजपाला टोला लगावला आहे.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री टॉप फाईव्हमध्ये आले आहेत. तामिळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलिन, ममता बॅनर्जी, नवीन पटनायक सुद्धा या यादीत आहेत. उद्धव ठाकरेही आहेत. पण भाजपचा एकही लोकप्रिय मुख्यमंत्री या टॉप फाईव्हमध्ये नाहीत याचं आश्चर्य वाटतं. खरं तर त्याचा अर्थ समजून घेतला पाहिजे. ज्या प्रकारे देशात भाजपचा ग्राफ कोसळत आहे. त्याचाही हा एक परिणाम आहे, असा टोला त्यांनी लगावला होता.

मुख्यमंत्री घरी बसूनच असल्याची त्यांच्यावर सातत्याने टीका होत होती. या टीकेचाही राऊत यांनी समाचार घेतला. घरी बसून टॉप पाचमध्ये येता येतं का? ममता बॅनर्जी, नवीन पटनायक, स्टॅलिन हे टॉप फाईव्हमध्ये आले ते घरी बसून आले का? याचं उत्तर विरोधकांनी दिलं पाहिजे, असं सांगतानाच त्याकाळात प्रत्येकाना वर्क फ्रॉम होमच करायचं होतं. तुम्ही उकीरडे फुंकत फिरलात कारण नसताना, त्याला आम्ही काय करणार, असा हल्लाही राऊत यांनी चढवला.

Team Global News Marathi: