सुनंदा पुष्कर मृत्यू प्रकरणी काँग्रेस नेते शशी थरूर यांची निर्दोष मुक्तता

 

 

नवी दिल्ली | सुनंदा पुष्कर मृत्यू प्रकरणात न्यायालयानं महत्त्वपूर्ण निकाल देत काँग्रेस नेते शशी थरूर यांना दिलासा दिला आहे. या प्रकरणात विविध आरोप झालेले काँग्रेसचे वरिष्ठ नेते शशी थरूर यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. आपली पत्नी सुनंदा पुष्कर यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोपी थरुर यांच्यावर लावण्यात आला होता. त्यामुळे देशातील राजकीय वातावरण बरंच तापलं होतं.

 

न्यायालयाकडून दिलासा मिळाल्यानंतर थरूर यांनी न्यायालयाचे आभार मानले आहेत. त्यांनी यावेळी सांगितलं की,  मागील साडेसात वर्षांपासून या प्रकरणात मला यातना आणि वेदना सहन कराव्या लागत होत्या. जी चूक मी केलं नव्हती त्या चुकीवरून मला टार्गेट केले होते. मात्र अखेर न्याय मिळाला आहे.

 

सुनंदा पुष्कर यांचं १७ जानेवारी २०१४ रोजी दिल्लीतील एका मोठ्या हॉटेलमध्ये निधन झालं होतं. मृत्यूपूर्वी काही दिवस आधी पुष्कर यांनी पती शशी थरूर यांचे एका पाकिस्तानी पत्रकाराशी अनैतिक संबंध असल्याचा आरोप केला होता. या प्रकरणी दिल्ली पोलिसांनी विविध कलमा अंतर्गत शशी थरूर यांच्याविरोधात गुन्हाही दाखल केला होता. पत्नीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आणि तिच्याशी क्रूरतेनं वागल्याचा आरोप शशी थरूर यांच्यावर होता.

Team Global News Marathi: