आमच्या पक्षात काही वाद नाहीत, थोरात-राऊतांच्या दिल्ली भेटीवर नाना पटोलेंची प्रतिक्रिया

 

मुंबई | महसूल मंत्री बाळासाहेब थोरात आणि ऊर्जा मंत्री नितीन राऊत दिल्लीत दाखल झाले आहेत. थोड्याच वेळात थोरात आणि राऊत काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेणार आहेत. राज्यात सुरू असलेल्या पक्षाअंतर्गत वादविवादाच्या तक्रारी करणार असल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान या भेटीवर आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे.

आमच्या पक्षात काही वाद नाहीत. दिल्लीत मंत्री त्यांच्या कामानिमित्ताने जात असतात. तसेच नितीन राऊत आणि बाळासाहेब थोरात गेले असावेत. नितीन राऊत ऊर्जा मंत्री आहेत, असं नाना पटोले यांनी म्हटलं आहे. कोरोनाच्या परिस्थितीत २ दिवसांच्या अधिवेशनात विधानसभा अध्यक्षची निवड शक्य नव्हती, असंही त्यांनी सांगितलं आहे.

तसेच पुढे बोलताना त्यांनी महापालिका निवडणुका स्वबळावर लढवण्यावर मी ठाम आहे. तथापि स्थानिक नेत्यांशी बोलून चाचपणी केली जाईल. नंतर योग्य वेळी योग्य निर्णय घेऊ, असंही नाना पटोले यांनी म्हंटल आहे.

Team Global News Marathi: