इंजिनचा प्रॉब्लेम काँग्रेसला, केंद्रातही अन् राज्यातही, फडणवीसांनी लगावला पटोलेंना टोला |

 

मुंबई | काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मोदी सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारावर टीका करताना मोदी सरकारने मंत्री बदलले,पण डबे बदलून उपयोग नाही तर इंजिनमध्ये बिघाड झाला आहे, ते बदलायला हवं अशी टीका केली होती. पटोलेंच्या या टीकेला आता भाजपकडून विरोधी पक्षनेते व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार प्रतिटोला लगावला आहे.

आता नाना पटोलेंच्या टीकेला प्रत्युत्तर देताना फडणवीस म्हणाले, ते डबे बदलून उपयोग नाही तर इंजिन बदलायला हवे हे त्यांचे वक्तव्य काँग्रेसबद्द्दल बोलत आहे का? असा प्रतिसवाल उपस्थित करत फडवणीस म्हणाले की,इंजिनचा प्रॉब्लेम हा काँग्रेस पक्षाला आहे. जो केंद्रातही आणि राज्यातही आहे.

फडणवीस म्हणाले, ओबीसींच्या प्रश्नाच्या मुद्द्यांवरून भाजपच्या १२ आमदारांचे निलंबन करण्यात आले. मात्र, यावरूनच सत्ताधारी पक्षाची मानसिकता उघड झाली आहे. १२ आमदारांचे निलंबन म्हणजे लोकशाहीला फासावर लटकवण्याचे‌काम महाविकास आघाडी‌ सरकारने केले आहे. या‌ सरकारला स्थानिक स्वराज्य‌ संस्थांच्या निवडणुकांपर्यंत टाईमपास करायचा आहे अशी टीका सुद्धा पटोले यांनी केली आहे.

Team Global News Marathi: