‘… तेव्हा मनमोहनसिंगांनी 16 हजार भारतीयांना मायदेशी आणले, पण मोठेपणा केला नाही’

 

मुंबई | रशियाने युक्रेनवर आक्रमण केल्यापासून भारत सरकार युक्रेनमध्ये अडकलेल्या आपल्या नागरिकांना परत आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. युक्रेनमध्ये अडकलेले बहुतेक लोक विद्यार्थी आहेत. भारतीयांना परत आणण्यासाठी सरकार विशेष विमान पाठवत आहे. मोदी सरकारने या मोहिमेला ‘ऑपरेशन गंगा’ असे नाव दिले आहे.

एअर इंडियाच्या विमानातून आतापर्यंत शेकडो विद्यार्थी आणि नागरिक मायदेशात परतले आहेत. सोशल मीडियावर या योजनेतून परत आलेल्या विद्यार्थ्यांचे, नागरिकांची माहिती देत मोदी सरकारचं कौतूक करण्यात येत आहे. मात्र, यावरुन काहीजण थेट केंद्रीय सरकारवर टिकाही करत आहेत.

बॉलिवूड अभिनेत्री रिचा चड्ढा हिने आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन एक इमेज शेअर केली आहे. त्यामध्ये, मनमोहनसिंग सरकारच्या काळातही अशाप्रकारे १६ हजार भारतीय नागरिकांना लीबियातून मायदेशी आणण्यात आल्याचे सांगितले. मात्र, मनमोहनसिंग सरकारने अशी जाहिरातबाजी किंवा गवगवा केला नाही, असे रिचाने म्हटले आहे. तसेच, मोदी सरकारने २१९ विद्यार्थ्यांना देशात आणले पण त्याचं ते भांडवल करत आहेत. जाहिरातबाजी करत आहे, युपीच्या निवडणुकांसाठी याचा प्रचार करत आहेत, असेही या इमेजमध्ये म्हटले आहे.

Team Global News Marathi: