…तर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस अडचणीत येतील, प्रदेशाध्यक्ष पटोले यांचा गौप्यस्फोट !

 

मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांच्यावरील चौकशीचा झोटिंग समितीचा अहवाल मंत्रालयातून गायब झाल्यानंतर विरोधकांनी सत्ताधारी महाविकास आघाडीवर घणाघाती टीका केली होती. मात्र हा अहवाल पुण्य मिळाल्यानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना इशारा दिला आहे.

विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळातील अनेक चिठ्ठे बाहेर आले तर देवेंद्र फडणवीस आणि त्यांचे इतर सहकारी अडचणीत येतील असा गौप्यस्फोट पटोलेंनी केल्यानं खळबळ माजली आहे. ते आज मुंबईत पत्रकार परिषदेत बोलता होते. तसेच त्यांनी यावेळी अनेक विषयांवर भाष्य केले होते.

पुढे बोलताना पटोले म्हणाले की, भाजपातील अनेक बहुजन नेत्यांचे खच्चीकरण केले हे सर्वांनाच माहिती आहे. खडसेंचे तर राजकीय नुकसान करण्याचा प्रयत्न झाला. झोटिंग समितीचा अहवाल अद्याप वाचला नाही परंतु तो पुढे येईल तेव्हा त्यातील फार्स कळून येतील. मागील सरकारच्या काळातील अनेक चिठ्ठे बाहेर आले तर फडणवीस आणि तत्कालीन मंत्री गोत्यात येतील असा दावा त्यांनी केला आहे.

Team Global News Marathi: