तर भविष्यात काम करण जड जाईल, रोहित पवारांचं सूचक विधान

मुंबई : राज्यात आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांचे फोन टॅपिंग प्रकरण समोर आल्यानंतर राज्याच्या राजकारणात एकचं खळबळ उडाली होती. यावर तयारकरण्यात आलेला हा अहवाल कुंटे यांनी तयार केलाच नसावा, असे फडणीवसांनी म्हटले आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या या टीकेला राष्ट्रवादी काँगेसचे आमदार रोहित पवार यांनी अप्रत्यक्षरित्या टोला लगावला आहे.

फोन टॅपिंग प्रकरणाबाबतचा अहवाल सीताराम कुंटे यांनी तयार केलाच नसेल. त्यांनी केवळ या अहवालावर सही करायला लावली असेल, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं होतं. त्यानंतर रोहित पवारांनी अप्रत्यक्षरित्या फडणवीसांना टोला लगावला आहे.

 

राज्याच्या मुख्य सचिवांनी दिलेला अहवाल मंत्र्यांनी तयार करुन त्यावर मुख्य सचिवांनी केवळ स्वाक्षरी केल्याचं काही अनुभवी नेत्यांचं म्हणण आहे. म्हणून भाजप सरकार असताना अशाच प्रकारे अहवाल तयार होत होते का?, असा प्रश्न मला पडला. पण हे सरकार व मुख्य सचिव असं करणार नाही याची मला खात्री आहे असे ट्विट रोहित पवारांनी केले आहे.

मुख्य सचिवांच्या अहवालातील अनेक बाबी धक्कादायक आहेत. महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्यासाठीच ‘फोन टॅपिंग’चं षडयंत्र रचण्यात आलं काय, अशी शंका या अहवालावरून येतेय. तसंच अधिकाऱ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून राजकीय गोळ्या झाडण्याची अशी प्रथा पडली तर भविष्यात प्रशासनाला काम करणंही अवघड होईल, अशी भीती पवारांनी व्यक्त केली आहे

Team Global News Marathi: