या राज्याने दिली सार्वजनिक ठिकाणी होळी खेळण्याची परवानगी

संपूर्ण देशभरात पुन्हा एकदा कोरोनाने आपलं डोकं वर काढलं आहे. आज वाढत असलेली रुग्णसंख्या राज्य सरकार तसेच केंद्र सरकारच्या अधकनी वाढवताना दिसत आहे. त्याच पार्श्वभूमीवर आगामी येणाऱ्या होळी आणि धुलिवंदन सण साजरे करण्यावर निर्बंध लादण्यात आले आहे

तसेच कोरोनाची स्थिती बिकट होत असल्याने केंद्रीय गृहमंत्रालयानेही काळजी घ्यायचे आवाहन केले आहे. होळी साजरी करण्यावर महाराष्ट्रासह बहुतेक राज्यांमध्ये निर्बंध आहेत. पण अशात एका मुख्यमंत्र्यांनी मात्र सार्वजनिक होळीला परवानगी द्यायचा निर्णय घेतला आहे.

सार्वजनिक ठिकाणी होळी खेळण्यास राजस्थानमधील गहलोत सरकारने परवानगी दिली आहे. होळी आणि शब-ए-बारातचे सार्वजनिक ठिकाणी आयोजन करण्यास मंजुरी दिली आहे. ही परवानगी २८-२९ मार्चला संध्याकाळी ४ ते रात्री १० वाजेपर्यंत असणार आहे. आयोजनस्थळी जास्तीत जास्त ५० जणांना उपस्थित राहण्याची मुभा असणार आहे. राजस्थान गृहखात्याने सुधारित आदेश जारी करत ही माहिती दिली आहे.

सार्वजनिक ठिकाणी होळी आणि शब-ए-बारात आयोजनावर नवा आदेश जारी करण्यापूर्वी बंदी घालण्यात आली होती. नागरिकांना घरीच होळी आणि शब-ए-बारात साजरा करण्याचं आवाहन करण्यात आले होते. पण आता सरकारने नव्या नियमावलीसह ही बंदी मागे घेतली आहे. जनता आणि सामाजिक संघटनांचा रोष पाहता सरकारने हा निर्णय घेतल्याचे म्हटले जात आहे.

Team Global News Marathi: