मग इस्त्रायलमध्ये शेती तंत्रज्ञान शिकण्यासाठी कृषी अधिकारी का पाठवले नाहीत? सचिन सावंत

 

मुंबई | इस्त्रायली पेगॅसस स्पायवेअरच्या मदतीने देशातील पत्रकार, राजकीय नेते, अधिकाऱ्यांचे फोन टॅप करुन हेरगिरी करण्यात आल्याचा दावा काही मीडिया संस्थांनी केला होता. याचे पडसाद महाराष्ट्रात सुद्धा दिसून आले होते.

तसेच तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या काळात फोन टॅपिंग झाल्याचा आरोप करण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेत हे आरोप फेटाळले. यावेळी त्यांनी बोलताना DGIPR चं शिष्टमंडळ इस्त्रायलला शेती तंत्रज्ञान शिकण्यासाठी गेले होते असं सांगितलं.

देवेंद्र फडणवीस यांचा हाच मुद्दा पकडत महाराष्ट्र काँग्रेसचे सचिव आणि प्रवक्ते सचिन सावंत यांनी फडणवीस यांच्यावर पलटवार केला आहे. “फडणवीस साहेबांच्या म्हणण्याप्रमाणे माहिती आणि जनसंपर्क विभागाचे अधिकारी शेती आणि शेती तंत्रज्ञान शिकण्यासाठी इस्त्रायल ला गेले होते. माहितीसाठी – इस्त्रायल दौऱ्याचा विषय ‘To study new trends in Government outreach programs and new ways of utilising social- web media’ होता” असं सचिन सावंत यांनी म्हटलं. सचिन सावंत यांनी कोणते विषय अभ्यासले याची यादी दिली आहे. यामध्ये शेती हा शब्द नाही आणि जर असता तर कृषी विभागाचे अधिकारी का पाठविले नाहीत? असा सवाल त्यांनी केला आहे.

 

Team Global News Marathi: