म्हणून मी फडणवीसांना माझा नेता मानत नाही; पंकजा मुंडेंचं पुन्हा स्पष्टीकरण

 

मुंबई | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्री मंडळाच्या विस्तारात पंकजा आणि प्रीतम मुंडे भगिनींना स्थान न मिळाल्यामुळे नाराज झालेल्या भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी मुंबई येथील कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत मोदी, शहा आणि नड्डा हे माझे नेते असे विधान करून फडणवीसांना डावलून नव्या चर्चेला तोंडफोडले होते.

पंकजा मुंडे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह हे आपले नेते असल्याचं म्हटलं होतं. मात्र, त्यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचं नाव न घेतल्यानं अनेकांच्या मनात वेगवेगळ्या शंका उपस्थित झाल्या आहेत. अशातच आता पंकजा मुंडे यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत थेट या प्रकरणावर भाष्य करत आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

यावेळी बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या की, देवेंद्र फडणवीस यांनी आणि मी एकत्र काम केलं आहे. राजकीय पटलावर एकत्र काम केल्यानं ते माझे सहकारी आहेत. मुख्यमंत्री म्हणून ते माझे बॉस आहेत. राजकारणात माझे नेते राष्ट्रीय स्तरावरील आहेत. कारण मी राष्ट्रीय सचिव म्हणून त्यांच्या टीममध्ये काम करते. केंद्रीय मंत्रिपदाचा विषय राष्ट्रीय नेतृत्वाने घेतला. त्यासंदर्भाने ते माझे नेते आहेत व त्यांचा निर्णय मला मान्य आहे.

Team Global News Marathi: