…मग मुख्यमंत्र्यांनी शब्द फिरवला कसं म्हणणार?; संभाजीराजे यांच्या उमेदवारीवरुन शाहू छत्रपती यांचे खडेबोल

“छत्रपती घराण्याचा अपमान झाल्याचा काही प्रश्न येत नाही”;  संभाजीराजेंच्या उमेदवारीवरुन शाहू महाराजांची प्रतिक्रिया

…मग मुख्यमंत्र्यांनी शब्द फिरवला कसं म्हणणार?; संभाजीराजे यांच्या उमेदवारीवरुन शाहू छत्रपती यांचे खडेबोल

राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी छत्रपती संभाजी राजे यांनी सर्व विधानसभा सदस्यांना पत्र पाठवून मदत करण्याचे आवाहन केले होते. ही निवडूक अपक्ष लढणार अशी घोषणा देखील संभाजी राजेंनी केली होती. मात्र कोणत्याच पक्षाकडून त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद न मिळाल्यामुळे त्यांनी या निवडणुकीतून माघार घेतली. या सर्व राजकारणामागे देवेंद्र फडणवीस आणि भाजपचीच खेळी असल्याचा खळबळजनक आरोप छत्रपती संभाजी राजेंचे वडील शाहू छत्रपतींनी केला आहे. पत्रकारांसोबत अनौपचारिक गप्पा मारत असताना त्यांनी हे वक्तव्य केले.

एबीपी माझाच्या वृत्तानुसार, “त्यांची व्यक्तिगतरित्या उमेदवारी नाकारली आहे. आमच्यात काही विचारविनिमय झाला असता किंवा मी त्यांना संमती दिली असती किंवा नसती. काही झालं असतं. पण तसा काही विचारविनिमय झाला नसल्यामुळे घराण्याचा अपमान झाल्याचा काही प्रश्न येत नाही. हे राजकारण आहे. माझ्यापर्यंत आले असते तर वेगळा विषय असता. पण तसं काही झालं नाही,” असे श्रीमंत शाहू महाराज म्हणाले.

बहुजन समाजातील मतांचे विभाजन होण्यासाठी फडणवीस आणि भाजपने जाणीवपूर्वक ही खेळी खेळली आहे. संभाजी राजेंना अपक्ष लढण्यास भाग पाडण्यात आले. शिवसेनेने संभाजी राजेंना उमेदवारी दिली नाही म्हणून छत्रपती घराण्याचा अपमान झाला हा विरोधकांचा आरोप चुकीचा आहे. संभाजी राजेंची ती राजकीय भूमिका होती. असे ते म्हणाले.

“राज्यसभेवर जाण्याचे जानेवारीपासून त्यांचे प्रयत्न सुरु झाले होते. त्यांची काय योजना होती याची कल्पना काही नव्हती. त्यावेळी देखील चर्चा नाही झाली. पण तिकडे जात असल्याचा निर्णय त्यांनी मला सांगितला. त्याला मी विरोध केला होता पण लोकशाही असल्याने ते कुठेही जाऊ शकतात,” असेही शाहू महाराज म्हणाले.

“आतापर्यंत छत्रपती घराण्याचा निर्णय आहे असं वेळोवेळी सांगत आले, पण त्यांचे निर्णय हे सगळे व्यक्तीगत होते. २००९ पासून त्यांनी वेगळी वाट पकडली,” असे शाहू महाराज म्हणाले.

“ड्राफ्ट म्हणजे कच्चा मसुदा होता. पण ते फायनल झालं असतं आणि मग विचार बदलला असता तर म्हणता येईल की शब्द फिरवला. पण वाटाघाडी चालू असताना, ड्राफ्ट स्टेजमध्ये असल्याने नक्की काही ठरलेलंच नव्हतं. जोपर्यंत त्याच्यावर शिक्कामोर्तब होत नाही, सही होत नाही तोपर्यंत काहीच नक्की नव्हतं. पण जिथे ड्राफ्ट शब्द वापरला म्हणजे त्याचा अर्थ ते कच्चे होते, फायनल झाले नव्हतं,” असेही शाहू महाराज म्हणाले.

ग्लोबल न्युज नेटवर्क: