आमदार रोहित पवारांना शिवसेना खासदाराचं भर कार्यक्रमात इशारा “तुमचे धंदे बंद करा”

 

 

राज्यात आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून तिन्ही पक्षत वाद होत असल्याचे चित्र दिसून येत आहे सध्या शिवसेनेच्या शिवसंपर्क अभियानाच्या माध्यमातून शिवसेना पक्ष वाढीवर लक्ष केंद्रित करत आहे अशातच आता शिवसेना खासदाराने थेट राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवारांवर निशाणा साधला आहे. शिवसेनेचे खासदार गजानन कीर्तिकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांच्यावर निशाणा साधत इशारा दिला आहे. हा सर्व प्रकार अहमदनगर जिल्ह्यात घडला आहे.

खासदार कीर्तिकर म्हणाले की, राज्यात महाविकास आघाडी करण्यात आमदार रोहित पवार यांचे आजोबा शरद पवार यांचे मोलाचे योगदान आहे. पवार कुटूंबाला मोठी परंपरा आहे. त्याची जान राजकारण करताना ठेवण्याची गरज आहे. त्यामुळे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांवर आमदार रोहित पवार यांनी दबाव टाकण्याचे धंदे बंद करावेत.

शिवसेना खासदार गजानन कीर्तिकर सध्या अहमदनगर जिल्हा शिवसंपर्क अभियानासाठी अहमदनगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी कर्जत येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. आज मुंबई लोकलनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी सर्वांत महत्त्वाची बातमी पुढे कीर्तिकर यांनी म्हटलं की, आमदार रोहित पवार यांनी आघाडीचा धर्म पाळत मतदारसंघांमध्ये शिवसैनिकांना आणि पदाधिकार्‍यांना विश्वासात घेऊन वाटचाल करावी. जिल्हा नियोजन समितीच्या निधीमध्ये शिवसेनेला वाटा देण्यात यावा.

Team Global News Marathi: