” ‘त्यांना’ पुन्हा मुख्यमंत्री होऊ देणार नाही”; ओवेसींच्या आव्हानाला योगी आदित्यनाथ यांच उत्तर |

 

उत्तर प्रदेश | उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीला अवघे काही महिने शिल्लक राहिलेले असताना स्थानिक राजकारण चांगलेच तापू लागले आहे. त्यात उत्तर प्रदेशातील सत्ता स्वतःकडे ठेवण्यासाठी भाजपा आखणी प्रयत्न करत आहे तर दुसरीकडे भाजपला रोखण्यासाठी इतर पक्ष मोर्चेबांधणी करत आहेत.

अशातच आता एमआयएमचे अध्यक्ष आणि खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी योगींना पुन्हा मुख्यमंत्री होऊ देणार नसल्याचे म्हटले आहे, तर त्यांचे हे आव्हान योगींनी स्वीकारले आहे. बिहारमध्ये चांगले यश मिळाल्यानंतर एमआयएम इतर राज्यांमध्येही विस्तार करताना दिसत आहे. आता उत्तर प्रदेशात होणाऱ्या निवडणुकीतही एमआयएम मैदानात उतरणार आहे.

आता खासदार असदुद्दीन ओवेसी यांच्या टीकेला योगी आदित्यनाथ यांनी सडेतोड उत्तर दिलं आहे. ‘उत्तर प्रदेशात भाजपाचे सरकार बनणार. ओवेसी हे देशातील मोठे नेते आहेत. ते देशभर प्रचार करत असतात. त्यांना एका समुदायाचा मोठा पाठिंबा आहे, पण उत्तर प्रदेशात ओवेसी हे भाजपाला आव्हान देऊ शकत नाही. भाजपा आपले मुद्दे आणि मूल्ये घेऊन निवडणुकीच्या रिंगणात उतरेल. आम्ही त्यांचे आव्हान स्वीकारतो,’ असा पलटवार योगी आदित्यनाथ यांनी ओवेसींवर केला.

Team Global News Marathi: