विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन आजपासून, दोन दिवस आरोप-प्रत्यारोपाचे ठरणार |

 

मुंबई | राज्य विधिमंडळाचे दोन दिवसांचे अधिवेशन सोमवारपासून सुरू होत असून भारतीय जनता पक्षाने आक्रमक भूमिका घेतलेली असून सत्ताधारी आघाडी पक्षाने सुद्धा विरोधकांच्या टीकेला सडेतोड उत्तर देण्याची महाविकास आघाडी सरकारने केलेली तयारी बघता अधिवेशना, jk/ujत आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी अन् गदारोळाने गाजणार असे चित्र दिसून येणार आहे.

या अधिवेशनात विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक होण्याची शक्यता धूसर आहे. कोणत्याही परिस्थितीत निवडणूक घेतलीच पाहिजे यासाठी काँग्रेस अडून बसली तरच निवडणूक होईल. ईडीची कारवाई, काही मंत्र्यांवर होत असलेले भ्रष्टाचाराचे आरोप, मराठा व ओबीसी आरक्षण आदी मुद्द्यांवरून अधिवेशनात सत्तापक्ष व विरोधक आमनेसामने असतील.

दोन दिवसांचे अधिवेशन घेऊन सरकारने लोकशाहीला कुलूप लावले असल्याचा हल्लाबोल फडणवीस यांनी केला असून आता या सरकारविरुद्ध रस्त्यावरचीही लढाई लढू असे सांगितले. तर केवळ गोंधळातच अधिवेशन संपावे असे विरोधकांना वाटते. महाराष्ट्राच्या हिताची एवढीच काळजी असेल तर अधिवेशन शांततेत होऊ द्या असे आवाहन शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी केले.

Team Global News Marathi: