“हिंदूह्रदयसम्राटाची पदवी बाळासाहेबांनंतर देवेंद्र फडणवीसांना देण्यात यावी”

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुणे दौऱ्यानंतर राजकीय वातावरण चांगलंच तापलं असून पुण्यातील कार्यक्रमावेळी विधानसभेतील विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गाडीवर राष्ट्रवादीच्या एका कार्यकर्त्याने चप्पल फेकली. या प्रकारानंतर भारतीय जनता पक्षाने आक्रमक भूमिका घेतली असून राष्ट्रवादीसह नेत्यांवर टीकेची तोफ डागली आहे.

भाजप आमदार नितेश राणे यांनी राष्ट्रवादीसह शिवसेना व काँग्रेसवर देखील सडकून टीका केली आहे. नितेश राणे यांनी देवेंद्र फडणवीसांचं मोठेपण सांगताना हिंदुहृदयसम्राटच्या मुद्द्यावरून शिवसेनेला छेडलं आहे. हिंदुह्रदयसम्राट यावरून नितेश राणेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना देखील लक्ष्य केलं आहे.

खरं म्हटलं तर आपण काही लोक हिंदुहृदयसम्राट असल्याचं बॅनरसहित फोटो लावतात. पण तुम्ही माझी भावना विचारली तर खरा हिंदुहृदयसम्राट ही पदवी अगर महाराष्ट्रामध्ये बाळासाहेबांनंतर कुणाला द्यायची असेल तर मी देवेंद्र फडणवीस साहेबांना द्यावी असं माझं म्हणणं आहे, असं वक्तव्य नितेश राणेंनी केलं आहे.

Team Global News Marathi: