“चप्पल भिरकावणं ही महाराष्ट्राची पद्धत नक्कीच नाही” रोहित पवारांनी व्यक्त केला संताप

 

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पुणे दौरा जितका महत्त्वाचा तितकाच वादग्रस्त देखील ठरताना दिसून येत आहे. अशातच पिंपरी चिंचवडमध्ये राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आले असताना त्यांच्या ताफ्यातील ते ज्या गाडीत बसले होते त्यादिशेन राष्ट्रवादीच्या एका कार्यकर्त्यानं चप्पल भिरकावल्याचा प्रकार समोर आला आहे. फडणवीसांचा ताफा आल्यानंतर राष्ट्रवादी आणि भाजप कार्यकर्ते समोरासमोर आल्यानं सर्व गोंधळ उडाला होता. परिणामी हा प्रकर घडला आहे. या घडलेल्या प्रकारावरून राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवारांनी संताप व्यक्त केला आहे.

“विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस साहेब हे मोठे नेते आहेत. त्यांच्या गाडीवर चप्पल भिरकवल्याचं समजतंय. कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर त्या व्यक्त करण्याचे अनेक संवैधानिक मार्ग आहेत. पण त्याऐवजी चप्पल भिरकावणं ही महाराष्ट्राची पद्धत नक्कीच नाही.”, असे ट्वीट करत रोहित पवारांनी नाराजी व्यक्त केली आहे.

 

दरम्यान या घटनेवरूनच भाजपने आक्रमक भूमिका घेत राष्ट्रवादीवर निशाणा साधला. तर भाजप-राष्ट्रवादीचे नेतेही आमने-सामने आले. यावरच आता भाजप नेते नितेश राणे यांनी राष्ट्रवादीला थेट आव्हानच दिले आहे. “राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एवढी हिंमत दाखवत असतील तर त्यांचे नेते राज्यात कसे फिरतात हे आम्ही पाहू. जागोजागी त्यांना चपलांचा हार घालण्याचा कार्यक्रमात आम्ही हातात घेऊ. मग चपला मोजण्याचं काम त्यांनी करावं.”, असा इशारा नितेश राणे यांनी दिला आहे.

Team Global News Marathi: