रिपब्लिकन पक्षाला काही भवितव्य राहिलेलं नाही – रामदास आठवले

रिपब्लिकन पक्षाला काही भवितव्य राहिलेलं नाही – रामदास आठवले

राजकारणात एकेकाळी दबदबा निर्माण करणाऱ्या रिपब्लिकन पक्षाला काही भवितव्य राहिलेलं नाही तसेच आज पक्षातील अनेक कार्यकर्ते इतर पक्षात प्रवेश करत आहे असे मत रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष तथा खासदार रामदास आठवले यांनी बोलून दाखविले आहे.

आता कार्यकर्तेही इतर पक्षांमध्ये जाऊ लागल्यामुळे यापुढे एकाकी लढण्यापेक्षा मोठय़ा पक्षाशी युती करूनच सत्तेचे राजकारण करावे लागणार आहे असे रामदास आठवलेंनी सांगितले आहे. ते ‘लोकसत्ता’ या वृत्तपत्राशी बोलताना त्यांनी हे बोलून दाखविले होते.

सोनिया राहतील की राहुल-प्रियंका कॉंग्रेसचा कार्यभार स्वीकारतील; काँग्रेस कार्यकारिणीची आज महत्वपूर्ण बैठक

महाराष्ट्राच्या मंत्रिमंळात कॅबिनेट मंत्री, पुढे तीन वेळा लोकसभेचे खासदार, आता आठ वर्षांपासून राज्यसभेचे खासदार, दुसऱ्यांदा केंद्रात मंत्री होण्याची संधी, इतक्या प्रदीर्घ काळ सत्तेचे राजकारण करूनही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संकल्पनेतील रिपब्लिकन पक्ष वाढविता आला नाही, गटबाजीने ग्रासलेल्या पक्षाला आता भवितव्य उरलेलं नाही असे रामदास आठवले यांनी बोलून दाखविले होते.

ग्लोबल न्युज नेटवर्क: