निमित्त ओबीसी आरक्षणाचे ; नणंद भावजयी मध्ये जुंपली

राष्ट्रवादीच्या नेत्या रोहिणी खडसे आणि भाजपा खासदार रक्षा खडसे यांच्यात चांगलीच जुंपली !

निमित्त ओबीसी आरक्षणाचे ; नणंद भावजयी मध्ये जुंपली

जळगाव | OBC आरक्षणाच्या मुद्द्यावर राज्यातील वातावरण चांगलेच तापलेले असताना फडणवीसांच्या विधानावर राष्ट्रवादीच्या नेत्या आणि एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे यांनी थेट फडणवीसांवर टीका केली होती आता रोहिणी खडसे यांनी फडणवीसांवर केलेल्या टीकेला रक्षा खडसे यांनी प्रतिउत्तर दिले आहे.

भारतीय जनता पक्षाने OBC समाजाचा विचार केला नसता तर विधानसभा निवडणुकीत रोहिणी खडसेंना संधी मिळाली नसती असा टोला रक्षा खडसे यांनी लगावला आहे. फडणवीसांवर रोहिणी खडसे यांनी केलेल्या टिकेवरून आता खडसे यांच्या घरातच नणंद-भावजयीत जुंपली आहे.

रोहिणी खडसे या राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्या आणि जिल्हा बँकेच्या अध्यक्षा आहेत. रक्षा खडसे या भाजपच्या खासदार आहेत.रोहिणी खडसे यांनी OBC नेतृत्व संपवणाऱ्या भाजपला आताच OBC ची कळवळा कसा आला? असा सवाल केला आहे. त्यावर भाजपने ओबीसी समाजाचा विचार केला नसता तर आमच्यासारख्या ओबीसींना संधी मिळाली नसती. रक्षा खडसे यांना २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत तिकीट मिळालं नसतं, असं उत्तर रक्षा खडसे यांनी दिलं आहे.

ग्लोबल न्युज नेटवर्क: