ईडीच्या छापेमारी विरोधात अनिल देशमुख यांच्या घराबाहेर राष्ट्रवादीचे आंदोलन |

 

नागपूर | राष्ट्रवादीचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या नागूपर आणि मुंबईतील निवासस्थानावर ईडीने छापा टाकला असून गेल्या चार तासांपासून चौकशी सुरू आहे. अनिल देशमुख यांच्या नागपुरातील निवासस्थानाबाहेर यावेळी केंद्रीय सुरक्षा दलाच्या जवानांना अर्थात सीआरपीएफचे जवान तैनात करण्यात आलं आहे.

देशमुख यांच्या घरावरील ईडीच्या छापेमारीनंतर राजकीय घडामोडींना वेग आला असून राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. अनिल देशमुख यांच्या समर्थकांनी नागपुरातील घराबाहेर ईडी आणि भाजपाविरोधात निदर्शनं केली. यावेळी काही काळ तणाव निर्माण झाला होता. नागपूर पोलिसांनी निदर्शन करणाऱ्या कायकर्त्यांना अटक केली असून त्यांना पोलीस ठाण्यात नेण्यात आलं आहे.

आज सकाळी ८ वाजल्यापासून नागपुरातील अनिल देशमुख यांच्या निवासस्थानी ईडीचे अधिकारी चौकशी करत आहेत. यावेळी अनिल देशमुख घरी नसून ते मुंबईत असल्याची माहती समोर आली आहे. देशमुखांच्या घरावर ईडीची छापेमारीचं वृत्त कळाल्यानंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी नागपुरात देशमुखांच्या घराबाहेर गर्दी केली.

Team Global News Marathi: