नवाब मलिकांनी फडणवीसांवर केलेल्या टीकेवर संजय राऊत यांची प्रतिक्रिया

 

मुंबई | भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी मलिक यांच्यावर निशाणा साधताना थेट राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि दाऊद यांच्यातील संबंधांवर प्रकाश टाकला होता. यावर आजच्या पत्रकार परिषदेत मंत्री नवाब मलिक यांनी थेट देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान मोदी यांच्यावर निशाणा साधला होता. आता त्या पाठोपाठ शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे.

राऊत म्हणाले की, ‘तपास यंत्रणांचा इतक्या मोठ्या प्रमाणात गैरवापर महाराष्ट्राने पाहिलेला नाही. राजकारणाचा विचार केला तर हमाम मे सब नंगे है, त्यामुळे ज्यांची स्वतःची घरं काचाची असतात, त्यांनी दुसऱ्यांच्या घरावर दगडफेक करू नये,’ असे संजय राऊत म्हणाले. तसेच संजय राऊत यांनी भाजपकडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावरही आरोप करण्यात होते त्यावरही भाष्य केले. ‘शरद पवारांवर आरोप करताना भाजपाच्या नेत्यांन लाज वाटली पाहिजे, असेही राऊतांनी म्हटले .

आमच्याही हातात दगड असू शकतात. मात्र, आम्ही संयम बाळगला आहे. कंबरेखालचे वाद आम्हाला नको आहेत, मात्र समोरच्याला हे करण्याची इच्छा असेल तर ते फार वाईट पातळीवर जाईल. तसेच शरद पवारांनी आतापर्यंत संस्कार असलेलं राजकारण केलंय,’ असंही राऊत यांनी सांगितलं. आम्ही नवाब मलिकांच्या पाठिशी आहोत. तपास यंत्रणांचा गैरवापर करून सरकारमधील मंत्र्यांना त्रास दिला जातोय, असा आरोप राऊतांनी केला.

Team Global News Marathi: