फडणवीसांच्या इशाऱ्यानंतर मलिक यांचे प्रतिउत्तर “है तैयार हम”,

 

मुंबई | राष्ट्रवादीचे नेते आणि मानती नवाब मलिक यांनी पत्रकार परिषेद घेऊन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप लगावल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी थेट मलिक यांच्यावर आरोप लगावत दिवाळीनंतर फटाके फोडण्याचे विधान केले होते. आता फडणवीस यांनी केलेल्या आरोपानंतर नावाबमलिक यांनी प्रतिउत्तर दिले आहे. तसेच फडणवीसांचे आव्हान सुद्धा स्वीकारले आहे.

 

दिवाळीमध्ये नवाब मलिक यांनी लवंगी फटाका लावला, पण दिवाळीनंतर मी बॉम्ब फोडणार असा इशारा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यार वसुलीचे आणि फडणवीसांच्या इशाऱ्यावर केंद्रीय यंत्रणा काम करत असल्याचा आरोप केला होता.
तसेच नीरज गुंडे हा देवेंद्र फडणवीसांचा सचिन वाझे असल्याचा आरोप नवाब मलिकांनी केला होता. यावर देवेंद्र फडणवीस यांनी मलिकांवर हल्लाबोल करत दिवाळीनंतर बॉम्ब फोडणार असल्याचा इशारा दिला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या इशाऱ्यावर राज्यातील ड्रग्जचा कारभार सुरु होता. फडणवीसांचा सचिन वाझे हा नीरज गुंडे आहे. नीरज गुंडे सर्व अधिकाऱ्यांच्या बदल्या, वसुलीचे काम पाहत होता असा आरोप नवाब मलिकांनी केला आहे. मलिकांच्या आरोपांवर फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन प्रत्युत्तर दिलं.

Team Global News Marathi: