पुढचा नंबर देवरांचा ! माजी केंद्रीय मंत्री मिलिंद देवरा देणार काँग्रेसला सोडचिट्टी !

मुंबई | माजी केंद्रीय मंत्री जितिन प्रसाद यांनी काल केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्या उपस्थितीत भाजपचा झेंडा हाती घेतला आहे. येन उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जितीन प्रसाद यांच्या सोडचिट्टीमुळे काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. मागच्या वर्षी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी पत्र लिहून संघटनात्मक निवडणूक घेण्याची मागणी करणाऱ्या 23 नेत्यांमध्ये जितिन प्रसाद यांचाही समावेश होता. याच दरम्यान आता माजी केंद्रीय मंत्री आणि माजी खासदार मिलींद देवरा हे सुद्धा लवकरच काँग्रेस सोडण्याच्या तयारीत असल्याची चर्चा होऊ लागली आहे.

 

ब्राह्मण नेते व माजी केंद्रीय मंत्री जितिन प्रसाद यांनी भाजपाचे सदस्यत्व मिळविल्यानंतर आता उर्वरित काँग्रेसवर नाराज असलेले नेतेही काँग्रेस पक्षाला रामराम ठोकणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. आता पुढचा क्रमांक महाराष्ट्र काँग्रेसचे नेते आणि माजी केंद्रीय मंत्री मिलिंद देवरा यांचा असेल अशी चर्चा राजकीय वर्तुळात होऊ लागली आहे. त्यातच देवरा यांनी एक ट्वीट करून पक्षाला यावर चिंतन करण्याचा सल्ला दिला आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार देवरा बऱ्याच काळापासून पक्षावर नाराज आहेत. गेल्या लोकसभा निवडणुकीवेळीही ते दक्षिण मुंबईतून निवडणूक लढविण्यास इच्छुक नव्हते. तसेच पराभूत झाल्यावरही तत्कालीन काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी देवरा यांना ते निवडणुकीत पराभूत झाले तरी त्यांना राज्यसभेत पाठविणार असल्याचे आश्वासन दिले होते. तथापि हे आश्वासन कधीच पूर्ण करण्यात आले नाही. वेळोवेळी देवरा पक्षाला सोडचिठ्ठी देणार असल्याची अफवा उडत राहिली आहे. त्यामुळेच काँग्रेस हायकमांडने जर वेळीच पावले उचलली नाही तर अनेक युवा नेते पक्षाला रामराम ठोकण्याची शक्यता आहे.

Team Global News Marathi: