नावातच UT आहे… U Turn बाबत आश्चर्य का वाटावे?

नावातच UT आहे… U Turn बाबत आश्चर्य का वाटावे?

कोरोनाच्या काळात लॉकडाऊनमुळे नागरिकांचे कंबरडे मोडलेले असताना त्यात वीज बिल कंपनीने भरमसाठ वीजबिल पाठवून नागरिकांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम केले आहे. त्यात मंत्री राऊत यांनी रीडिंग प्रमाणे आलेले वीजबिल भरावेत लागेल असे वक्त्यव्य केले होते. या निर्णयाविरोधात मनसे आणि भाजपाने राज्य सरकारवर ताशोरे ओढले होते. त्यात आता भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना टोला लगावला आहे.

यावरच आता भाजप नेते अतुल भातकळकर यांनी ट्विट केले आहे. ट्विट मध्ये म्हणले कि, ‘नावातच UT आहे… U Turn बाबत आश्चर्य का वाटावे?’ असा टोला भाजप नेते अतुल भातकळकर यांनी महाविकास आघाडी सरकारला लगावला आहे.

राज्यावर आलेल्या प्रत्येक संकटाच्या वेळी कर्तव्यातून आपले हात झटकत पळ काढणाऱ्या या सरकारला कायमचं पळवून लावूया. वाढीव वीजबिलासंदर्भात सवलत देऊ, अशी वारंवार घोषणा करुन युटर्न घेणाऱ्या सरकारचा जाहीर निषेध, असे ट्विट भाजपने केले होते.

ग्लोबल न्युज नेटवर्क: