अल्पकालावधीसाठी पंतप्रधान पुण्यात येत असल्यामुळे मुख्यमंत्र्यांना उपस्थित राहण्याची आवश्यकता नाही –

अल्पकालावधीसाठी पंतप्रधान पुण्यात येत असल्यामुळे मुख्यमंत्र्यांना उपस्थित राहण्याची आवश्यकता नाही – पंतप्रधान कार्यालय

सध्या संपूर्ण जगभरावर कोरोनाचे संकट उभे थाटले आहे. त्यामुळे सर्व जगभराच्या नजरा कोरोनावर मात करणाऱ्या लसीकडे लागले आहे. त्यात पुनावाला यांच्या सिरम इन्स्टिटयूड ऑफ इंडियाने विकसित केलेल्या कोवीशील्ड लसी संदर्भात माहिती घेण्यासाठी शनिवारी २८ नोव्हेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी पुणे येथे भेट देणार आहेत.

मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पंतप्रधानांच्या कार्यक्रमावेळी पुण्यात उपस्थित राहणार नाहीत. शिष्टाचारानुसार पंतप्रधानांचे स्वागत करायला मुख्यमंत्री हजर असतात. पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दुसऱ्या मंत्र्यांना मोदी यांच्या स्वागतासाठी पाठवणार आहेत. शिवसेनेचे भारतीय जनता पक्षाबरोबर बिघडलेल्या संबंधांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री जाणार नसल्याची चर्चा त्यामुळे सुरू झाली होती.

मात्र यावर आता पंतप्रधान कार्यालय यांच्याकडून स्पष्टीकरण देण्यात आले आहे. पंतप्रधान हे पुणे दौऱ्यात अगदी छोट्या कालावधीसाठी सिरम इन्स्टिट्यूटला भेट देणार असून लगेच पुढच्या प्रवासासाठी परतणार आहेत त्यामुळे मुख्यमंत्री किंवा राज्यपाल यांनी उपस्थित राहण्याची आवश्यकता नाही असे पंतप्रधान कार्यालयाकडूनच कळविण्यात आले आहे. या सुचनेमुळेच मुख्यमंत्री ठाकरे आणि राज्यपाल भगत सिंह कोश्यारी हे पंतप्रधानांचे आगमन व दौऱ्यात उपस्थित राहणार नाहीत

ग्लोबल न्युज नेटवर्क: