बहुचर्चित जॉन अब्राहम याचा “सत्यमेव जयते २’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला !

 

मुंबई | सिने-अभिनेता जॉन अब्राहम याचा आगामी ‘सत्यमेव जयते-२ ′ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात जॉन पुन्हा एकदा भ्रष्टाचाराच्या विरोधात लढाई करताना दिसणार आहे. या चित्रपटाचा नवीन ट्रेलर सध्या सोशल मीडियावर खूपच व्हायरल होत असून प्रेक्षकांनी चांगलीच प्रसिद्धी दिली आहे.

‘सत्यमेव जयते’ चित्रपटाला बॉक्‍स ऑफिसवर चांगला प्रतिसाद मिळाला होता. त्यानंतर आता चित्रपटाचा दुसरा भाग येत आहे. यात जॉनने एका पोलीस अधिकाऱ्याची भूमिका स्वीकारली आहे. चित्रपटात शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी दिव्या संघर्ष करताना दिसून येणार आहे.२०१८ साली प्रदर्शित झालेला ‘सत्यमेव जयते’देखील भ्रष्टाचारावर भाष्य करणारा होता.

तर नव्या ‘सत्यमेव जयते २′ मध्ये भ्रष्टाचार अधिक विस्तारात दाखवण्यात येणार आहे. हा सिनेमा २५ नोव्हेंबरला सिनेमागृहात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेः. दरम्यान, चित्रपटामध्ये ऍक्‍शनचा तडका असणार आहे, असा ट्रेलरवरून अंदाज येत आहे. विशेष म्हणजे जॉन यात तीन पात्र साकारणार आहे. त्याच्याशिवाय दिव्या खोसला कुमार, राजीव पिल्लई आणि अनुप सोनी मुख्य भूमिकेत दिसून येणार आहेत.

Team Global News Marathi: