काँग्रेसने ट्विट केलेल्या राहुल गांधी आणि राऊत यांच्या फोटोने घेतले सर्वांचे लक्ष वेधून

 

नवी दिल्ली | आज काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांनी ब्रेक फास्ट करण्यासाठी विरोधी पक्षांच्या नेत्यांना बोलावलं होतं. यावेळी शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत हे राहुल गांधी यांच्या बाजूला बसले होते. नाश्त्याच्या टेबलवरही राऊत आणि राहुल गांधी जवळजवळ होते. तसेच विरोधी पक्षातील अनेक खासदार या बैठकीला हजर होते.

त्यात काँग्रेसने ट्विटरवरून शेअर केलेल्या फोटोमध्ये राहुल गांधी यांनी संजय राऊत यांच्या खांद्यावर हात टाकलेला
फोटो सुद्धा शेअर केला आहे. या दोन्ही नेत्यांमध्ये काही तरी गंभीर विषयावर चर्चा सुरू आहे. राऊतही तोंडावरचा मास्क काढून धीर राहुल यांच्या बोलण्याकडे कान देत गंभीरपणे ऐकताना दिसत आहे.

तसेच दोन्ही नेत्यांच्या नजरा जमिनीला खिळलेल्या दिसत आहे. आजच्या बैठकीला १०० खासदार उपस्थित होते. मात्र, त्यामध्ये राहुल यांनी राऊत यांच्या खांद्यावर हात ठेवून गप्पा मारल्याने राजकीय वर्तुळात नव्या चर्चेला उधाण आले आहे. विशेष म्हणजे काँग्रेसने त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर हाच फोटो अपलोड केल्याने या दोन्ही नेत्यांच्या मैत्रीसंबंधावर जोरदार चर्चा होत आहे.

 

तसेच राऊत यांनी काल राहुल यांची भेट घेतली होती. त्यानंतर राऊत यांनी ट्विट केलं. राहूल गांधी यांच्याशी आज भेट झाली. गांधी यांच्याशी महाराष्ट्र तसेच राष्ट्रीय राजकारणावर सविस्तर चर्चा झाली. राज्य सरकारच्या कामा विषयी त्यांनी समाधान व्यक्त केले. शिवसेनेची जडणघडण तसेच कार्यपद्धती बाबत त्यांनी जाणून घेतले, असं राऊत यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

Team Global News Marathi: