शिवसेनेच्या प्रवक्त्यांची यादी जाहीर खा.राऊत, सावंतांसह यांना दिली संधी

मुंबई : सचिन वाझे प्रकरणामध्ये विरोधकांनी शिवसेनेवर आणि ठाकरे सरकारवर तोंडसुख घेतलं आहे. विरोधकांनी शिवसेना आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करण्याची एकही संधी सोडली नाही. विरोधकांकडून शिवसेना आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका होत असताना पक्षाची बाजू केवळ मोजक्याच लोकांनी मांडली. यामध्ये संजय राऊत हे परखडपणे पक्षाची बाजू मांडत विरोधकांना प्रत्युत्तर देताना दिसत होते. मात्र इतरांकडून असे होताना दिसत नव्हते. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या प्रवक्त्यांची नवीन यादी जाहीर करण्यात आली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने शिवसेनेच्या प्रवक्त्यांची अधिकृत यादी मुखपत्र सामना मधून जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते म्हणून खासदार संजय राऊत आणि खासदार अरविंद सावंत यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याशिवाय अन्य प्रवक्त्यांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. यामध्ये खासदार प्रियंका चतुर्वेदी, परिवहन मंत्री अनिल परब, उपनेते सचिन अहिर, आमदार सुनील प्रभू, प्रताप सरनाईक, भास्कर जाधव, अंबादास दानवे, मनिषा कायंदे यांची नावे आहेत.

 

तसेच महापौर किशोरी पेडणेकर, नगरसेविका शीतल म्हात्रे, डॉ. शुभा राऊळ, किशोर कान्हेरे, संजना घाडी, आनंद दुबे, या नेत्यांचाही यामध्ये समावेश करण्यात आला आहे. शिवसेनेच्या Shiv Sena मध्यवर्ती कार्यालयातून नवीन प्रवक्त्यांच्या नावाची यादी जाहीर करण्यात आली आहे.

 

ग्लोबल न्युज नेटवर्क: