मजुरांना मिळणार ३००० रुपये पेन्शन ; पंतप्रधान मोदींची योजना

 

देशातील गरीब कामगार वर्गाला सक्षम करण्यासाठी केंद्र सरकार सर्व प्रकारच्या कल्याणकारी योजना राबवत असते. पीएम किसान योजनेप्रमाणेच सरकारने मजुरांसाठी अनेक योजना राबवल्या आहेत.असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या मजुरांना वयाच्या ६० वर्षांनंतर निवृत्ती वेतन मिळावे, यासाठी केंद्र सरकारने प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजना सुरू केली आहे.

या योजनेंतर्गत मजूर, वीटभट्टी किंवा बांधकामावर काम करणारे कामगार, पादत्राणे बनवणारे, कचरा वेचणारे, घरगुती कामगार, धुलाई, रिक्षाचालक, जमीन नसलेले मजूर, विडी कामगार अशा इतर मजुरांना पेन्शन दिली जाते. यासोबतच त्या मजुरांचाही यात समावेश करण्यात आला आहे, ज्यांचे उत्पन्न १५ हजार रुपयांपेक्षा कमी आहे. असंघटित क्षेत्रात सुमारे ४२ कोटी कामगार केंद्र सरकारच्या या योजनेशी संबंधित व्यक्तीला वयाची ६० वर्षे पूर्ण केल्यानंतर दरमहा ३००० रुपये पेन्शन दिली जाते.

दरम्यान, लाभार्थीचा मृत्यू झाल्यास निवृत्ती वेतनाच्या ५० टक्के रक्कम पती-पत्नीला पेन्शन म्हणून दिली जाते. एका अंदाजानुसार देशात असंघटित क्षेत्रात सुमारे ४२ कोटी कामगार आहेत. या योजनेतील अर्जदाराचे वय १८ ते ४० वर्षांच्या दरम्यान असावे.

Team Global News Marathi: