देशाचा राजा कायम राहील पण महामारी आणि आर्थिक संकटाची तीव्रता वाढेल

बुलडाणा: तब्बल साडेतीनशे वर्षांची परंपरा असलेल्या भेंडवळच्या भविष्यवाणीची परंपरा यंदाही कायम आहे. या वर्षी कोरोना प्रोटोकॉलचे पालन करत भविष्यवाणी सांगण्यात आली. बुलडाणा जिल्ह्यातील भेंडवळ येथे दरवर्षी पाऊस-पाणी, पीक याचे अंदाज वर्तविण्यासाठी भविष्यवाणी करण्याची प्रथा आहे. चंद्रभान महाराज आणि त्यांच्या वंशजांसह पाच लोकांनी अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर भेंडवळ येथे घट मांडणी केली. आज (शनिवार १५ मे २०२१) सूर्योदयापूर्वी घटमांडणीचे निरीक्षण करुन भाकीत वर्तविण्यात आले.

 

यंदा महाराष्ट्रात साधारण पाऊस पडेल आणि साधारण पीक येईल. देशाला नैसर्गिक आपत्तीचा धोका आहे. देशाचा राजा कायम राहील पण महामारी आणि आर्थिक संकटाची तीव्रता वाढेल. जूनमध्ये साधारण तर जुलैमध्ये चांगला पाऊस पडेल. ऑगस्टे, सप्टेंबरमध्ये पावसाचे प्रमाण कमी असेल; असे भाकीत सांगण्यात आले. सारंगधर महाराजांनी भाकीत सांगितले.

 

 

दरवर्षी पंचक्रोशीतील ग्रामस्थांच्या उपस्थितीत भाकीत वर्तविले जाते. भाकीत वर्तविण्याच्या माळरानावर प्रचंड गर्दी असते. पण यंदा कोरोना संकटामुळे निवडक लोकांच्या उपस्थितीत भाकीत वर्तविण्यात आले.

ग्लोबल न्युज नेटवर्क: