‘द कश्मीर फाइल्स’चं पंतप्रधानांनी केलं कौतुक; चित्रपटाच्या संपूर्ण टीमची घेतली भेट

 

द कश्मीर फाइल्स’ हा चित्रपट सध्या चर्चेत असून हा चित्रपट ११ मार्च रोजी प्रदर्शित झाला आहे. चित्रपटाला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून बॉक्स ऑफिसवर देखील हा चित्रपट धुमाकूळ घालत आहे. चित्रपटातील कलाकारांच्या अभिनयाला आणि कथानकला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. नुकतीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या चित्रपटाच्या टीमची भेटी घेतली. यावेळी नरेंद्र मोदी यांनी चित्रपटाच्या टीमचं कौतुक केलं.

‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपटाचे निर्माते अभिषेक अग्रवाल , विवेक रंजन अग्निहोत्री आणि अभिनेत्री पल्लवी जोशी यांनी पंतप्रधानांची भेट घेतली. नरेंद्र मोदी यांच्यासोबतचे फोटो अभिषेख अग्रवाल यांनी ट्विटरवर शेअर केले आहे. या चित्रपटाचे पंतप्रधान मोदींनी तोंडभरून कौतुक केले आहे.

तसेच फोटो शेअर करून अभिषेक यांनी कॅप्शनमध्ये लिहिले, ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटून खूप आनंद झाला. त्यांनी आमच्या चित्रपटाचं कौतुक केलं. धन्यवाद मोदीजी.’ हे ट्वीट शेअर करून अभिषेख यांनी नरेंद्र मोदी यांना टॅग केलं आहे. असदर छत्रपटात मिथुन चक्रवर्ती, पल्लवी जोशी, प्रकाश बेलावडी, अनुपम खेर, दर्शन कुमार, भाषा सुंबली, चिन्मय मंडलेकर, पुनीत इस्सर, मृणाल कुलकर्णी, अतुल श्रीवास्तव आणि पृथ्वीराज सरनाइक ही बडी स्टारकास्ट आहे.

Team Global News Marathi: