काँग्रेस पक्ष दलालांचा दलाल, मंत्री प्रकाश जावडेकर यांची टीका
हाथसर येथे एका अल्पवयीन दलित मुलीवर झालेल्या बलात्कारप्रकरणी देशातील वातावरण चांगलेच तापलेले होते. त्यात काँग्रेसनेते राहुल गांधी हे पीडित कुटुंबियांना भेटण्यासाठी गेले असता त्यांच्यावर उत्तरप्रदेश पोलिसांनी धक्काबुकी करत लाठीचार्ज केला होता. त्यामुळे संपूर्ण देशभरातून भाजपावर टीका होताना दिसत होती. आता या टीकेला मंत्री प्रकाश जावडेकर यांनी उत्तर दिले आहे.
देशात कृषी विधेयक आणण्यासाठीचा प्रस्ताव काँग्रेसचाच होता. आता या कायद्यांनाच विरोध केला जात आहे हा विरोध राजकीय असल्याचं जावडेकर यांनी म्हटलं आहे. तसेच पुढे बोलताना त्यांनी काँग्रेस दलालांचा दलाल असल्याचं म्हणत जावडेकरांनी टीका केली आहे.
दरम्यान, या कायद्यामुळे देशतील दलाल नेस्तनाबूत होतील आणि शेतकऱ्यांना याचा जास्तीत जास्त फायदा होणार असल्याचे जावडेकरांनी म्हटले आहे. मात्र काँग्रेसला दलाल म्हंटल्यामुळे जावडेकरांच्या टीकेला काँग्रेस नेते असे उत्तर देणार आहेत हे पाहावे लागणार आहे.