राज्यपाल सध्या कामात आहेत, सवड मिळाल्यावर सही करतील, राजू शेट्टी यांनी लगावला टोला |

 

मुंबई | सध्या राज्यात राज्यपाल नियुक्ती आमदारांचा मुद्धा तापत असताना यावरूनच महाविकास आघाडी सरकार आणि राज्यपाल यांच्यातील वाद आता आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. राजू शेट्टी यांना आज प्रसारमाध्यमांनी राज्यपाल नियुक्त रखडलेल्या १२ आमदारांचा नियुक्तीचा प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी त्यांनी राज्यपाल भगतसिंग सध्या कामात आहे. त्यांना सवड मिळाल्यावर ते सही करतील, असं मिश्किल भाष्य केलं आहे.

दिल्लीत मागच्या कित्येक महिन्यांपासून कृषी विधेयकाविरोधात आंदोलन सुरू आहे. त्या आंदोलनाला केरळ आणि पाश्चिम बंगाल राज्य सरकारने ठराव करून पाठिंबा दिला आहे. त्यानुसार आपल्या राज्य सरकारने दोन्ही सभागृहात शेतकर्‍यांच्या आंदोलनाला पाठिंबा द्यावा. त्यामुळे त्यांना अधिक बळ मिळण्यास मदत होईल.

तसेच कृषी विधेयकाला न्यायालयाने स्थगिती दिली आहे. त्यामुळे आपल्या राज्यात कृषी विधेयक आणाचे झाल्यास ते निर्दोष असावे आणि शेतकर्‍यांच्या हिताचे असावे,’ अशी भूमिका राजू शेट्टी यांनी मांडली होती. मंगळवारी याच मुद्द्यावर राजू शेट्टी यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेऊन कृषी विधेयकासंदर्भात चर्चा केली होती.

Team Global News Marathi: