एकनाथ शिंदे यांचे सरकार पडल्यावर पहिले ट्वीट, ‘त्या’ अफवांवर विश्वास ठेऊ नका…

एकनाथ शिंदे यांचे सरकार पडल्यावर पहिले ट्वीट, ‘त्या’ अफवांवर विश्वास ठेऊ नका…

उद्धव ठाकरे यांचे सरकार कोसळल्यानंतर एकनाथ शिंदे यांचं पहिलं ट्वीट

वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा हिंदुत्वाचा विचार, धर्मवीर आनंद दिघे साहेबांची शिकवण, महाराष्ट्राचा सर्वांगिण विकास आणि आमदारांच्या मतदारसंघातील विकास कामे हाच आमचा फोकस.

असेल असं म्हटलं आहे. तर दुसऱ्या एका ट्वीट मध्ये एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत कोणती आणि किती मंत्रीपदे याबाबत अद्याप कोणतीही चर्चा झालेली नाही, लवकरच होईल. तोपर्यंत कृपया मंत्रिपदाच्या याद्या आणि याबाबत पसरलेल्या अफवा यावर विश्वास ठेवू नका.

असं या ट्वीट मध्ये म्हटलं आहे.

उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर देवेंद्र फडणवीस हे सरकार स्थापन करणार असल्याचं जवळ जवळ निश्चित मानलं जात आहे.

या सरकारची संभाव्य मंत्रीपदाची लिस्ट सध्या विविध माध्यमांवर चालवली जात आहे. त्याचबरोबर सोशल मीडियावर देखील ही लिस्ट व्हायरल झाली आहे. यावर शिंदे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.

ग्लोबल न्युज नेटवर्क: