राष्ट्रवादीकडून आपत्तीग्रस्तांसाठी मदतीचा पहिला टेम्पो महाडच्या दिशेने रवाना !

 

सध्या कोकणासह पश्चिम महाराष्ट्राला पावसाने झोडपले असून अनेक नद्यांना पूर येऊन चिपळूणसह पश्चिम महाराष्ट्रातील सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्याला पुराचा मोठा फटका बसला आहे.यः अप्र्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष मदतीसाठीस अल्सवाले आहेत.

त्यातच आता राष्ट्रवादी आपल्यासोबत’ या अभियानामार्फत महाडच्या आपत्तीग्रस्तांसाठी राष्ट्रवादीकडून मदतीचा पहिला टेम्पो महाडच्या दिशेने रवाना झाला आहे. खालापूरवरुन राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी हा मदतीचा टेम्पो महाडच्या दिशेने पाठवला. राज्याचा समृद्ध भाग आज प्रचंड अडचणीत असताना आपल्या मदतीची त्यांना गरज आहे, असं सांगत राष्ट्रवादीच्या युवक कार्यकर्त्यांनी मदतीचा टेम्पो महाडकडे पाठवला.

धान्य, कपडे, ब्लँकेट, औषध, सॅनेटरी, फुड पॅकेट्स, बिस्किट, दूध, मिनरल वॉटर अशी मदत पाठवण्यात आलेली आहे. महाडमध्ये गेल्यानंतर स्थानिक सांगतील त्या ठिकाणी ही मदत पोहोचवली जाईल, असं राष्ट्रवादी युवक काँँग्रेसकडून सांगण्यात आलं आहे.

कोकण आणि त्याच्या आसपासच्या परिसरात पावसाने रौद्र रूप धारण करत थैमान घातलं आहे. आपल्या राज्याचा हा समृद्ध भाग आज प्रचंड अडचणीत आणि संकटात सापडला आहे. ही वेळ आहे आता आपल्या बाह्या सरसावण्याची… कोकण आणि पूरग्रस्त बांधवांना मदतीला धावून जायची… महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी, पदाधिकाऱ्यांनी आणि हितचिंतकांनी आपल्या कोकण भूमी साठी कंबर कसायची आहे.

Team Global News Marathi: