भारतीय जनता युवा मोर्चाच्या मागणीला यश;राज्यातील सर्वच विद्यापीठांसाठी शुल्क कपात करणार असल्याची माहिती उच्च तंत्र शिक्षण मंत्री यांनी केली जाहीर |

 

राज्यभरात सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिक्षण ऑनलाईन पद्धतीने सुरू असल्याने विद्यार्थ्यांकडून पूर्ण शुल्क न घेता शुल्कामध्ये सूट द्यावी अशी मागणी भारतीय जनता युवा मोर्चाने राज्य सरकारकडे लाऊन धरली होती.या मागणीसाठी राज्यभर निदर्शने करून शुल्क कपातीची मागणी करत निषेध ही व्यक्त केला होता.याच महत्त्वपूर्ण विषयात विद्यार्थी आणि पालकांना त्वरित दिलासा द्यावा याकरिता भाजयुमो प्रदेश अध्यक्ष श्री विक्रांत पाटील यांच्या प्रतिनिधी मंडळाने राज्यपाल महोदयांचीही भेट घेऊन मागणी केली होती.

नागपूर विद्यापीठातही संघर्षाची भूमिका घेत भाजयुमो ने यशस्वी आंदोलन करत सदर शुल्कात सूट मिळवून घेतली होती.त्याच निर्णयाचा आधार घेत राज्यातील सर्वच विद्यापीठांनी अशी शुल्क कपात करावी अशी घोषणा करणार असल्याची माहिती राज्याचे उच्च तंत्र शिक्षण मंत्री श्री उदय सामंत यांनी ट्विट द्वारे दिली आहे.

“देर आये-दुरुस्त आये”.भारतीय जनता युवा मोर्चाच्या मागणीचा सकारात्मक विचार करून विद्यार्थी व पालकांना दिलासा देण्याचा निर्णय करणार असल्याबद्दल भाजयुमो प्रदेश अध्यक्ष श्री. विक्रांत पाटील यांनी शिक्षण मंत्री यांचे आभार मानले आहेत. अजून महत्वाच्या दोन मागण्या प्रलंबित असून,सन २०२०-२१ साठीही हा निर्णय लागू करावा
आणि शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी सर्व शाळांना सुद्धा हा निर्णय लागू करावा या मुख्य मागण्यांवर ही त्वरित सकारात्मक निर्णय करावा अशी मागणी भाजयुमो प्रदेश अध्यक्ष विक्रांत पाटील यांनी केली आहे.

Team Global News Marathi: