केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या घरी देखील धाडी टाकतील उद्धव ठाकरे यांचा मोदी सरकारला टोला

केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या घरी देखील धाडी टाकतील उद्धव ठाकरे यांचा मोदी सरकारला टोला

आपला शेतकरी शेतात मरमर मरुन सोनं पिकवतो. सोनं म्हणजे अन्न, नाहीतर त्याच्या घरावरही धाडी पडतील, असा टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्रातील मोदी सरकारला लगावला आहे. आज केंद्र सरकार शेतकऱ्यांचे हक्क हिरावून बाहेरुन कांदा, साखर आणत आहे. हा कुठला कारभार आहे? असा सवाल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी रविवारी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते बोलत होते. या पत्रकार परिषदेला उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री जयंत पाटील आदी महाविकास आघाडीचे नेते उपस्थित होते.

भारतीय जनता पक्षाचं मागील वर्ष फक्त आघाडी सरकार कधी पडतंय आणि कधी पडणार याचे मुहुर्त काढत बसण्यात गेले आहेत. त्यामुळे सरकारने काय काय कामं केलीत हे त्यांनी पाहिलंच नसेल. सरकारने मागील वर्षभरात काय कामं केलीत याची पुस्तिका नुकतीच महाराष्ट्राच्या जनतेसमोर ठेवली. जनतेत कुठंही सरकारबद्दल नाराजी किंवा असमाधान असल्याचा सूर नाही. विरोधी पक्षांच्या नावातच विरोधी आहे त्यामुळे त्यांना विरोधी या शब्दाला जागावं लागतं. त्यामुळे ते जे काही म्हणताय ते त्यांच्यापुरते बरोबर आहे असंही मत उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केले .

दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करणारे शेतकरी हे डावे आहेत, अतिरेकी आहेत, पाकिस्तानी आणि चिनी आहेत की आणखी कुठून आले आहेत हे भाजपच्या सर्व नेत्यांनी एकदा ठरवावं. जर शोध लागत असेल तर त्यांची फेरयंत्रणा फार प्रभावी मानावी लागेल. आपल्याच अन्नदात्यावर अन्याय करताना त्याला तुम्ही देशद्रोही आणि अतिरेकी ठरवणं हे आपल्या संस्कृतीत बसत नाही असे उद्धव ठाकरे म्हणाले

ग्लोबल न्युज नेटवर्क: