अवघ्या सात तासात जनतेचे काय प्रश्न मांडायचे, फडणवीसांचा आघाडी सरकारला सवाल

अवघ्या सात तासात जनतेचे काय प्रश्न मांडायचे, फडणवीसांचा आघाडी सरकारला सवाल

कोरोनाच्या पाश्वभूमीवर यंदा नागपूर येथे होणारे हिवाळी अधिवेशन रद्द करण्यात आले आहे. त्या जागी मुंबईत सोमवार आणि मंगळवार असे दोन दिवसीय हिवाळी अधिवेशन मुंबई येथे पार पडणार आहे. यासाठी तयारी सुद्धा राज्य सरकारकडून करण्यात आलेली आहे. मात्र या दोन दिवसीय चालणाऱ्या अधिवेशनावर आता राज्याचे विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी टीका केली आहे.

कोरोना संकटासोबत सर्व पातळ्यांवर अपयशी ठरलेलं महाविकास आघाडी सरकार आता अधिवेशनही अवघ्या सात तासांचे घेत आहे. त्याला काहीही अर्थ नाही आम्ही. जनतेचे प्रश्न कसे मांडायचे? असा प्रश्न मुख्यमंत्र्यांच्या चहापान कार्यक्रमवर बहिष्कार टाकत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी विचारला आहे.

राज्य आघाडी सरकार स्थापन झाल्यापासून विविध प्रश्नावरून विरोधकांनी सरकारला अडचणीत आणण्याचा पुरेपूर प्रयत्न केला आहे. त्यात मागच्या सात महिन्यापासून ओढवलेल्या कोरोनाच्या संकटामुळे राज्याच्या विकासाकडे लक्ष देऊन कोरोनावर मात करण्याचा प्रयत्न राज्य सरकार करत आहे.

ग्लोबल न्युज नेटवर्क: