नागरिकांच्या बेफिकीर वागण्याने एकवेळ अशी येईल की, रुग्णालयात बेड कमी पडू लागतील – नवाब मलिक

मुंबई : मुंबई : राज्यात पुन्हा एकदा कोरोनाने आपलं डोकं वर काढलं आहे. आज वाढत असलेली रुग्णसंख्या राज्य सरकार तसेच स्थानिक प्रशासनाच्या अडचणी वाढवताना दिसत आहे. त्यात शुक्रवारी मुख्यमंत्र्यांनी फेसबुकच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधत येणाऱ्या दिवसात कडक लॉकडाऊन करण्यासंदर्भात पाऊले उचलण्याचे संकेत दिले होते.

त्यातच आता यावर राष्ट्रवादीचे नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी भाष्य केले आहे. कोरोना रुग्णांची संख्या वाढत असतानाही लोक गार्डन आणि बाजारपेठांमध्ये बेफिकीरपणे फिरत आहेत. लग्नाला जात आहेत. अशा बेफिकीर वागण्याने एकवेळ अशी येईल की, रुग्णालयात बेड कमी पडू लागतील. लोकांनी वेळीच परिस्थितीचे गांभीर्य ओळखले पाहिजे, असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री नवाब मलिक यांनी केले आहे.

मंत्री मलिक यांनी रविवारी प्रसार मद्यमांशी संवाद संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्यात लॉकडाऊन लागण्याचे स्पष्ट संकेत दिले. मुख्यमंत्र्यांनीं अद्याप लॉकडाऊनचा निर्णय घेतलेला नाही. ते तज्ज्ञांशी चर्चा करत आहेत. मात्र, राज्यात दिवसाला कोरोनाचे 50 हजार रुग्ण सापडल्यानंतरही लोकांना परिस्थितीचे सोयरंसुतक नाही, असे नवाब मलिक यांनी म्हटले.

Team Global News Marathi: