शरीरात जीवनसत्त्वे वाढवायची आहेत.. तर मग नक्की गावरान बोर खा..

 

हिवाळ्याच्या सुरुवात झाली असून बाजारात आंबट, गोड चवीची बोरंही यायला लागली आहेत. खायला रुचकर आणि पाहताच क्षणी जिभेला पाणी आणणारी बोरं जीवनसत्वांचे भांडार असतात. बोरं खाणे आरोग्याच्या दृष्टीने फायदेशीर आहे. यात असणाऱ्या अँटी-ऑक्सीडेंट्समुळे लिव्हर संबंधीत समस्या दूर होते, तसेच त्वचा दीर्घकाळ तरुण राहण्यासाठी देखील बोरं खाणे फायदेशीर ठरते. जाणून घेऊया बहुगुणी बोरांची फायदे…

1. बोरांमध्ये मोठ्या प्रमाणात ‘क’ जीवनसत्त्व, ‘अ’ जीवनसत्त्व आणि पोटॅशियम असते. हे घटक रोग प्रतिकारक क्षमतेला बळकट बनवतात.

2. बोरं खाल्ल्याने त्वचा दिर्घकाळ तरुण राहते. यामध्ये अँटी-ऐजिंग तत्त्व असतात आणि यामुळे त्वचा चमकदार, चिरतरुण राखण्यास मदत होते.

3. बध्दकोष्टची समस्या असेल तर बोरं खाणे फायद्याचे असते. बोरं पचनक्रिया चांगली बनवण्यात मदत करते.

4. बोरांमध्ये मुबलक प्रमाणात कँल्शियम आणि फॉस्फोरस असते. हे दात आणि हिरड्यांना मजबूत बनवण्याचे काम करते.

5. कर्करोगाला प्रतिकार करणा-या पेशी वाढवण्याचे काम बोरं करतात.

6. एक चमचा बोराचा रस आणि काळी मिरी यांचे सेवन केल्यास सर्दीपासून संरक्षण होते.

 

7. अतिसार, थकवा तसेच भूक न लागणे आदी विकारांवरही बोरं अतिशय गुणकारी आहेत.

8. अस्थमा आणि मधुमेहाचा त्रास असल्यांनी बोरं आवर्जून खावी. रक्तातील साखर नियंत्रित राखण्याचे काम बोरं करतात.

9. वजन कमी करण्यासही बोरं मदत करतात, तसेच यात असणाऱ्या ‘अ’ जीवनसत्वामुळे पचनशक्ती सुधारते.

 

10. कॅल्शिअम आणि फॉफ्सरसचे प्रमाण अधिक असल्यामुळे हाडं आणि दातांच्या मजबुतीसाठी बोरं खाणे फायदेशीर आहे.

ग्लोबल न्युज नेटवर्क: