भाजपने मला जेवढे छळले तेवढं भाजपाला महागात पडणार – एकनाथ खडसे

काही महिन्यांपूर्वी एकनाथ खडसे यांनी भाजपाला सोडचिट्टी देऊन राष्ट्र्वादीत प्रवेश केला होता. या प्रवेशानंतर जळगावात भाजपाला घरघर लागली होती. त्यात ईडीकडून एकनाथ खडसे यांना चौकशीची नोटीस बजावण्यात आली होती. यावर आता राष्ट्रवादीचे नेते आणि माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी भाष्य करत भाजपाला इशारा दिला आहे.

”मला जेवढे छळाल तेवढे भाजपाला महागात पडेल. जेवढे मला छळाल, तेवढा तुमच्या बरोबर असलेला वर्ग तुम्हाला सोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दाखल होईल असा इशारा राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसेंनी दिला आहे. मुक्ताईनगरमध्ये राष्ट्रवादीने एक मेळावा आयोजित केला होता, त्या मेळाव्यात एकनाथ खडसे बोलत होते.

या मेळाव्यात बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी देखील भाजपला लक्ष्य केले. नाथाभाऊला कसे तुरुंगात टाकता येईल, यासाठी भाजपकडून सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. परंतु मी आयुष्यभर कधीही दोन नंबरचे धंदे केले नाहीत. जिल्ह्यात कोणाकडून नोकरीसाठी किंवा भरतीसाठी एक रुपया घेतला नाही. असे असेल तर कुणी सांगावे, तोंडात शेण घालावे, असं म्हणत त्यांनी भाजपलाही चांगलेच सुनावले होते.

Team Global News Marathi: