कीर्तनकार शिवलीला पाटील पाटील यांच्या घरी एक नव्हे तर दोन पाहुण्यांचे आगमन; होतोय शुभेच्छांचा वर्षाव

कीर्तनकार शिवलीला पाटील पाटील यांच्या घरी एक नव्हे तर दोन पाहुण्यांचे आगमन; होतोय शुभेच्छांचा वर्षाव

सोलापूर : युवा महिला कीर्तनकार शिवलीला पाटील(बार्शी कर) महाराष्ट्रात आपल्या खास शैलीमुळे लोकप्रिय आहेत. त्या कौटुंबिक जीवनातील वेगवेगळे प्रसंग, समाजातील वेगवेगळ्या गोष्टी, अधूनमधून विनोदाची पेरणी करत विविध दृष्टांत देत कीर्तन सादर करतात. शिवलीलाची कीर्तनाची स्वतःची अशी वेगळी खास शैली आहे. त्याचबरोबर बिगबॉस मध्ये सहभागी झाल्यापासून त्या प्रचंड चर्चेत आल्या होत्या.

सोशल मीडियावर त्यांना मानणारा, फॉलो करणारा वर्ग बराच मोठा आहे. त्यांचे किर्तनाचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. तसेच त्या सोशल मीडियावरून त्यांच्या आयुष्यातील अपडेट्स चाहत्यांसोबत शेअर करत असतात. सध्या चर्चा आहे ती त्यांच्या नव्या फॅमिली मेंबरची. त्यासाठी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

कीर्तनकार शिवलीला पाटील यांचा वाढदिवस नुकताच झाला. प्रत्येक जण वाढदिवस खास होण्यासाठी काही ना काही सेलिब्रेशन करत असतो किंवा काहीतरी गिफ्ट खरेदी करत असतो. असच शिवलीला पाटील यांनी वाढदिवसाचं खास सेलिब्रेशन केलं आहे.

त्यांनी वाढदिवसानिमित्त एक नव्हे तर दोन दोन गाड्या खरेदी केल्या आहेत. त्यांनी सोशल मिडियावरून चाहत्यांना ही माहिती दिली आहे. त्यांनी इनोव्हा ही एक फोर  व्हीलर तर स्कुटी ही एक टू व्हीलर खरेदी केली आहे.

वाढदिवसानिमित्त त्यांच्या घरात नवीन फॅमिली मेंबरचे आगमन झाले आहे. चाहत्यांनी यावेळी शिवलीला पाटील यांचे अभिनंदन केले आहे. त्यांच्या या पोस्टवर भरभरून लाईक्स आणि कमेंट्स करत चाहत्यांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

कीर्तनकार शिवलीला पाटील या बिग बॉस या स्पर्धेत सहभागी झाल्यामुळे चांगल्याच चर्चेत आल्या होत्या. शिवलीला पाटील बिग बॉस मराठीच्या तिसऱ्या पर्वात सहभागी झाल्यानं वारकरी संप्रदाय आणि वारकरी संघटना त्यावर नाराज होत्या.

 

त्यासाठी त्यांच्यावर बरीच टीकाही झाली होती. त्यानंतर अल्पावधीतच त्या प्रकृती स्वास्थ्याचं कारण बिग बॉसमधून बाहेर पडल्या होत्या. तसेच पाटील यांनी ‘बिग बॉसमध्ये गेले ही माझी चूक होती’ असे म्हणत वारकरी संप्रदायाची माफीही मागितली होती. शिवलीला पाटील या नुकत्याच झी टॉकीजवरील मन मंदिरा – गजर भक्तीचा या कार्यक्रमात आषाढी वारी विशेष भागात कीर्तन करताना दिसल्या होत्या.त्या मूळच्या बार्शी जि सोलापूर येथील आहेत.

ग्लोबल न्युज नेटवर्क: