कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची खासगी ट्रॅव्हल्सकडून सर्रास लूट

 

तब्बल दोन वर्षानंतर यंदाचा गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे. दोन वर्षानंतर गणेशोत्सवासाठी अनेकांचा ओढा गावाकडे असल्याचे दिसून येत आहे. मात्र, गणेशोत्सवानिमित्त गावी जाणाऱ्या सामन्यांची खासगी ट्रॅव्हल चालकांकडून लूट होत असल्याची बाब समोर आले आहे. त्यामुळे प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे

यंदा जादा बस असल्या तरी गणेशोत्सवानिमित्ताने अधिक भाडे वसूल केले जात असल्याची कबुली एका खासगी ट्रॅव्हल चालकाने माध्यमाने केलेल्या स्टिंग ऑपरेशनमध्ये दिली आहे. त्यामुळे खासगी ट्रॅव्हल्सच्या तिकीट दर निश्चितीचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.कोकणात मोठ्या प्रमाणावर गणेशोत्सव साजरा केला जातो. गणेशोत्सवानिमित्त एसटीने जादा बसेस सोडल्या आहेत. त्याशिवाय, मध्य रेल्वे आणि कोकण रेल्वेनेही अतिरिक्त एक्स्प्रेस चालवल्या आहेत.

कोकणावासियांकडून याला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. मात्र, एसटी आणि रेल्वेत आरक्षण न मिळाल्याने अनेकांकडून खासगी वाहतुकीचा पर्याय अवलंबला जातो. प्रवाशांची असलेली गरज पाहता खासगी बस चालकांकडून मोठ्या प्रमाणावर तिकीट दर वाढवले जात आहेत. विशेष म्हणजे अधिक बस असल्याने आसने रिक्त आहेत. मात्र, सणानिमित्ताने दरवाढ करण्यात आली असल्याचे समोर आले आहे.

 

Team Global News Marathi: