अभिनेता सुबोध भावेला कोरोनाची लागण, घरीच केले स्वतःला क्वारंटाइन; संपूर्ण कटुंब कोरोनाबाधित

मराठी चित्रपटसृष्टीतही कोरोनाचा शिरकाव झाला आहे. मराठीतील प्रसिद्ध अभिनेता सुबोध भावेचे घर कोरोनाच्या विळख्यात सापडले आहे. सुबोधसह त्याच्या पत्नी आणि मोठ्या मुलाला कोरोनाची लागण झाली आहे. सुबोधने इंस्टाग्रामवर एक पोस्ट करुन ही माहिती दिली आहे.

”मी, मंजिरी आणि माझा मोठा मुलगा कान्हा आम्हा तिघांनाही कोरोनाची लागण झाली आहे. आम्ही घरीच स्वतःला क्वरांटाइन करून घेतले आहे. तज्ज्ञ डॉ.च्या मार्गदर्शनाने उपचार घेत आहोत. तुम्ही सगळे काळजी घ्या आणि सुरक्षित रहा. गणपती बाप्पा मोरया”, अशी पोस्ट सुबोधने शेअर केली आहे.

ग्लोबल न्युज नेटवर्क: