आपण कोणाविषयी बोलतोय याचं थोडं भान ठेवा. आपली कारकिर्द काय आपण बोलता काय? भाजपाचा चाकणकरांवर टोला

 

पुणे | मराठा आरक्षण देण्यात केंद्र सरकारहची भूमिका अडचणीची ठरत आहे,’ असा आरोप करत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी गावोगावी जाऊन सभा घेत जनतेला वस्तुस्थिती सांगण्याची घोषणा केली. पवारांच्या या टीकेला भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापुरात पत्रकार परिषद घेऊन सडेतोड उत्तर दिले आहे. गावोगावी जाण्यापेक्षा मंत्रालयात एकत्र बैठक बोलवा, मग खरे कोण आणि खोटं कोण हे कळेल असा टोला मारला होता.

पवारांवर केलेल्या टीकेवरून राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी चंद्रकांत पाटलांना टोला लगावला आहे. चंद्रकांत पाटील आपलं जितकं वय आहे तितकी शरद पवारांची संसदीय कारकीर्द आहे हे आपण लक्षात घ्यावं, असं म्हणत रूपाली चाकणकर यांनी चंद्रकांंत पाटलांन टोला हाणला आहे.

मात्र आता चाकणकरांच्या टिकेला आता भाजप महिला मोर्चाच्या प्रदेश अध्यक्षा उमा खापरे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून खापरे यांनी आपला एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये त्यांनी चाकणकर यांना उत्तर दिले आहे. त्या म्हणाल्या की, ‘आपण कोणाविषयी बोलतोय याचं थोडं भान ठेवा. आपली कारकिर्द काय आपण बोलता काय? राजकारणातील शूर्पणखा होणार नाही याची काळजी घ्या?’ असा टोला त्यांनी रुपाली चाकणकारांना लगावला आहे.

Team Global News Marathi: