ती महिला माझ्या मुलीसारखी होती, आमदार भास्कर जाधव यांची पहिली प्रतिक्रिया !

 

नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी पावसाचा जोर काहीसा ओसरल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोकणातील पूरग्रस्त भागाचा दौरा केला होता. मात्र या दौऱ्यावेळी आपली व्यथा मांडणाऱ्या एका व्यापारी महिलेबरोबर आमदार भास्कर जाधव गैरवर्तन केलं. तसेच मुख्यमंत्र्यांसमोरच त्या महिलेसोबत गैरवर्तनच प्रकार घडल्यामुळे सर्वत्र संताप व्यक्त होत आहे. यावर आता आमदार भास्कर जाधव यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे.
.
. ‘मला यावर काहीच बोलायचं नाही. लोकांना मदत करणं हाच माझा प्राथमिक हेतू आहे. कालही मला लोकांना मदत करायची होती. ती महिला माझ्या मुलीसारखी होती. तिच्यासोबत किंवा माझ्या नातू किंवा भाचासारख्या असणाऱ्या मुलासोबतही मी बोलायचं नाही आणि तेसुद्धा कोणत्यातरी चॅनेलच्या प्रतिनिधीला विचारुन बोलायचं असेल तर काम कऱणं कठीण आहे. पण ज्यांनी मला बदनाम करण्याचा प्रयत्न केला त्याच्यावरच सोशल मीडियावर लोक तुटून पडले आहेत,’ असं भास्कर जाधव म्हणाले आहेत.

तसेच यावर प्रतिक्रिया देताना खासदार संजय राऊत म्हणाले की, ‘भास्कर जाधवांबाबत मी पाहिलं नाही, वृत्तपत्रांमध्ये वाचलं. त्यामुळे त्या सगळ्यावर तेच बोलतील. पण या अशा सगळ्या परिस्थितीमध्ये संयम ठेवणे गरजेचे आहे. लोकांचा आक्रोश वेदना समजून घेणे महत्त्वाचे आहे आणि मुख्यमंत्री आणि सरकार हे करते आहे’, असं संजय राऊत म्हणाले आहेत.

 

Team Global News Marathi: