मुंबई | राम मंदिरासंदर्भात ‘सामना’तुन शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलेल्या टीकेवर भाजपच्या युवा मोर्चाने शिवसेना भवनासमोर निषेध आंदोलन केले. त्यावेळी शिवसेनेचे कार्यकर्तेही तिथे जमले आणि दोन्ही गटात तुफान राडा झाला. यावरून शिवसेनेनं सामनातून उत्तर दिलं. आता भाजपचे महाराष्ट्र प्रदेश सचिव आणि माजी खासदार निलेश राणे यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे.
दादर मध्ये सेना भवन आहे… दादर कोणाच्या बापाचं नाही. तो दिवस लांब नाही ज्या दिवशी सेना भवनच्या काचा फुटलेल्या दिसतील. संज्या गुंडगिरीच्या वार्ता करतो ह्यापेक्षा मोठा विनोद नाही. लुक्का आहे एक नंबरचा.
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) June 17, 2021
राणे यांनी ट्विट करून टीका केली आहे, ते आपल्या ट्विटमध्ये म्हणतात की, ‘दादर मध्ये सेना भवन आहे… दादर कोणाच्या बापाचं नाही. तो दिवस लांब नाही ज्या दिवशी सेना भवनच्या काचा फुटलेल्या दिसतील. संज्या गुंडगिरीच्या वार्ता करतो ह्यापेक्षा मोठा विनोद नाही. लुक्का आहे एक नंबरचा.’असं म्हणत त्यांनी राऊत याना टोला लगावला आहे.
दरम्यान, राज्यातील वातावरण चांगलंच तापल असून निलेश राणे यांनी ट्विट करत केलेल्या टीकेला शिवसेना काय प्रतिक्रिया देते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
संजय राऊत म्हणाले आहे की, ‘जेव्हा जेव्हा शिवसेना भवनाकडे वाकड्या नजरेने पाहिलं तेव्हा तेव्हा अशाप्रकारचा राडा झाला आहे. शिवसेना भवन हे महाराष्ट्राच्या अस्मितेचं प्रतिक आहे. ती बाळासाहेब ठाकरे यांची वास्तू आहे. त्याच्यावर चाल करण्याचा प्रयत्न केल्यावर शिवसैनिक आणि मराठी माणूस गप्प बसेल का? शिवसेना भवनाकडे वाकड्या नजरेने पाहणाऱ्यांना प्रसाद मिळणारच हे मी ऑन रेकॉर्ड सांगतो.’ असे विधान त्यांनी केले होते.