मुंबई | सामना अग्रलेखात जी भाषा वापरण्यात आलीय ती थर्डक्लास आहे आणि ही भाषाही थर्डक्लासच माणूस वापरू शकतो. प्रत्येक चॅनेलवर शिवीगाळ करण्याची भाषा वापरली जाते. खालच्या पातळीची भाषा वापरताय. त्यांना त्याच भाषेत उत्तर द्यावा लागणार. संजय राऊतांचा वापर राष्ट्रवादी काँग्रेस निरोधासारखा करतेय आणि करत राहणार अशी घणाघाती टीका मनसेचे नेते संतोष धुरी यांनी केली आहे.
संतोष धुरी म्हणाले की, राज ठाकरे जे आदेश देतील त्या आदेशाचं पालन केले जाईल. गृहमंत्री आज जी बैठक घेतायेत ते चांगले आहे. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार, अनाधिकृत भोंगे काढावे असे आदेश सरकार देईल अशी अपेक्षा आहे. कायदा सुव्यवस्था पाळायची असेल तर अनाधिकृत भोंगे हटवावे लागतील.
तसेच मनसे कार्यकर्त्यांना सभा घेण्यापूर्वीपासून नोटिसा देण्यात येत आहे. निर्बंध घातले जात आहे. हनुमान चालीसा, महाआरती म्हणू शकत नाही. आम्ही पाकिस्तानात राहतोय का? चुकीचं चाललं असेल तर त्यावर बोलू शकत नाही का? असा सवाल त्यांनी केला. यामुळे येणारी आत शिवेना आणि मानसी यांच्यातील वाद आणखी चिघळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.